कमालच झाली! दिव्यांशीला 600 पैकी 600 गुण!!

2297

कोणत्याही परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविणे हे स्वप्नवत गोष्ट. पण हे स्वप्न अखेर प्रत्यक्षात आले आहे. लखनौच्या दिव्यांशी जैन या विद्यार्थिनीने यंदाच्या सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेत ही कामगिरी बजाविली आहे. तीने या परीक्षेत चक्क 600 पैकी 600 गुण मिळवून उभ्या हिंदुस्थानाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. दिव्यांशीने इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि विमा या सहाही विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. दिव्यांशी ही लखनौमधील नवयुग रेडियन्स स्कूलमधील विद्यार्थिनी असून या कामिगरीने तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कामगिरीनंतर प्रतिक्रिया देताना दिव्यांशी म्हणाली की, मला पैकीच्या पैकी गुण मिळतील असा स्वप्नातही विचार केला नव्हता, दहावीमध्ये दिव्यांशीला 97.6 टक्के गुण मिळाले होते. दिव्यांशीचे वडील प्रकाश जैन व्यावसायिक असून आई सीमा जैन गृहिणी आहे.

सीबीएसई बारावीच्या निकालात 5.38 टक्क्यांची वाढ

  • एकूण निकाल 88.78 टक्के
  • 38 हजार 686 विद्यार्थी 95 टक्क्यांवर
  • कोरोनामुळे गुणवत्ता यादी नाही
आपली प्रतिक्रिया द्या