
चर्मकार समाजातील छोटय़ा-मोठय़ा उद्योजकांना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत तात्काळ कर्ज मिळावे, अशी मागणी शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयूर कांबळे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन केली. याबाबत वित्त विभागाच्या सचिवांना योग्य ते निर्देश दिले जातील, असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले. वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला बसून ‘अत्यावश्यक सेवक’ म्हणून अत्यंत अल्प मोबदल्यात चप्पल दुरुस्ती व चप्पल विक्रीचे काम करणाऱया चर्मकार समाजाच्या गटई कामगारांचे तो काम करीत असलेल्या हद्दीतील नगरपरिषद, महानगरपालिका यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात यावे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या मुंबईतील देवनार येथील मुख्य कार्यालयाचे काम त्वरित मार्गी लावण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणीही मयूर कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

























































