
चांदिवली विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्र. 159 मधील शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार श्रीप्रकाश शुक्ला यांच्या प्रचार फेरीला शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी उपस्थिती दर्शवली. ही रॅली धोबीघाट येथील निवडणूक कार्यालयातून सुरू होऊन शिवप्रेमी, दत्त नगर, सुभाष नगर, शिवसेना शाखा, कुलकर्णीवाडी, जंगलेश्वर मंदिर, नाहर गेट, दुर्गामाता मंदिर गल्ली, खैरानी रोड, साईबाबा मंदिरमार्गे परेरावाडी येथे सांगता झाली. या भव्य रॅलीत शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अंधेरी पूर्व प्रभाग क्र. 72 च्या शिवसेना उमेदवार मनीषा मनोहर पांचाळ यांच्या प्रचारफेरीला सर्वधर्मीय जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र. 32 मधील उमेदवार गीता भंडारी यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचारफेरीत किशोर भंडारी, वंदना भंडारी, राखी कोळी, भारती पाटील यांच्यासह शिवसैनिक, मनसैनिक सहभागी झाले होते.
























































