कोस्टल रोडचा ‘मावळा जोमात’! सहा महिन्यांत महाकाय बोगद्याचे 25 टक्के काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया कोस्टल रोडच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारे दोन महाकाय बोगदे खोदण्याचे काम ‘मावळा’ टनेल मशीन वेगाने करीत आहे. प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत जमिनीखाली प्रत्येकी 2 किमी असणाऱया एका बोगद्याचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत एका बोगद्याचे काम पूर्ण होईल, तर दुसऱया बोगद्याचे काम सुरू करण्यात येईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा आणि वाहतूक काsंडीमुक्त करणाऱया कोस्टल रोडचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. 13 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱया पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे 36 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमीच्या या कामात 2.07 किमीचे दोन महाबोगदे अत्याधुनिक ‘मावळा’ नावाच्या टनेल बोअरिंग मशीनने खोदण्यात येत आहेत. जमिनीखाली 10 ते 70 मीटर खोल हे बोगदे खोदत

असताना मोठय़ा प्रमाणावर खडक फोडले जात आहेत.

80 हजार डंपर डेब्रिजचा पुनर्वापर

  • कोस्टल रोडचे बोगदे खोदताना 4 लाख क्युबिक मीटर डेब्रिज निघणार आहे. प्रतिडंपर सहा ते साडेसहा क्युबिक मीटरप्रमाणे तब्बल 80 ते 88 हजार डंपर डेब्रिज निघणार आहे. यातील 70 टक्के डेब्रिजचा वापर रोडच्या कामासाठी केला जाणार आहे.
  • या मार्गात बेसॉल्ट, ब्रेशिया आणि वेफर्ड रॉक अशा प्रकारचे मजबूत खडक आहेत. या बोगद्याच्या खोदकामात निघणाऱया खडीचा वापर रस्त्यासाठी, दगड-मातीचा उपयोग भरावासाठी करण्यात येत आहे. डेब्रिजसह खोदकाम करताना आढळणाऱया पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे.

असे सुरू आहे बोगद्याचे काम

कोस्टल रोडचे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून आणले गेलेले देशातील सर्वात मोठे टनेल मशीन 2300 टन वजनाचे असून याची उंची तब्बल इमारतीच्या तीन मजल्यांइतकी आहे. स्वयंचलित टनेल बोअरिंग मशीनने बोगद्याच्या खोदकामातील डेब्रिज स्वयंचलित पद्धतीनेच बाहेर पडत आहे.