कोरोना रोखण्यासाठी,पावसाळापूर्व कामांसाठी ‘रोडमॅप’ तयार – महापालिका आयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दोन आठवड्यांत कोरोना आटोक्यात येईल आणि पावसाळापूर्व कामेही वेळेत पूर्ण होतील, असा ठाम विश्वास नवनियुक्त पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी व्यक्त केला. यासाठी मुंबई महानगरपालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर चार तासांची मॅरेथॉन बैठक झाली असून यात ‘रोडमॅप’ तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त चहल यांनी कारभार हाती घेताच कोरोनासह पावसापूर्व कामे पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्यवाही करणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या पालिकेसमोर दोनच टार्गेट आहेत. ती म्हणजे कोरोना रोखणे आणि पावसाळापूर्व कामे पूर्ण करणे. ही दोन्ही कामे आव्हानात्मक असली तरी ती पूर्ण करण्यासाठी पालिकेची तयारी असल्याचे आयुक्त चहल म्हणाले. कोरोना हॉटस्पॉटसह आवश्यक त्या ठिकाणी स्वत: जाऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका कर्मचारी युद्ध पातळीवर काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहे. दोन आठवड्यात सर्व सुरळीत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.