काँग्रेस उमेदवार अमीन पटेल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

270

मुंबादेवीचे काँग्रेस उमेदवार अमीन पटेल यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आलॅ. पटेल यांनी सत्यमेव जयते या चिन्हाचा गैरवापर केला तसेच विधानसभेच्या लेटरहेडचा वापर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनसारख्या देशद्रोह्याला वाचवण्यासाठी केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

पटेल यांनी या लेटरहेडवर राष्ट्रपतींना याकूब मेमनला वाचवण्याबाबतचे पत्र पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या भाषणातील मुद्दे चुकीच्या पद्धतीने सादर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान,  पटेल यांची उमेदवारीही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या