काँग्रेसला तारणार की बुडवणार? संजय निरुपम व मल्लिकार्जुन खरगेंमध्ये वाजलं

1503
sanjay-nirupam

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राज्यातील काँग्रेस पक्षामधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमधील वातावरण तापले असून माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे. सोमवारी संजय निरुपम यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रविवारी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठऱवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीवरून निरुपम यांनी खरगे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींच्या समर्थकांची कारकिर्द संपवण्याच षडयंत्र, संजय निरुपमांचा आरोप

महान नेता खरगे यांनी रविवारी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी बैठक बोलावली होती. ही बैठक फक्त 15 मिनिटांमध्ये आवरण्यात आली. बैठकमध्ये कोणालाही बोलण्याची संधी देण्यात आली नाही. बैठकीमध्ये फक्त खरगे बोलले आणि माझी खिल्ली उडवून निघून गेले, असा आरोप निरुपम यांनी केला. तसेच हे असे महान रणनितीकार काँग्रेसला तारणार की बुडवणार? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

संजय निरुपम यांची पक्ष सोडण्याची धमकी

तिकीट वाटपावरून घमासान
विधानसभा निवडणुकीसाठीच्या तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. संजय निरुपम यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील तिकीट वाटपावरून आपली नाराजी दर्शवली होती. तसेच काही ज्येष्ठ नेतेही पक्षामध्ये आपल्याला हवे तेवढे महत्त्व मिळत नसल्याने नाराज आहेत.

स्टार प्रचारकांमध्ये स्थान नाही
दरम्यान, काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांमध्ये मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी स्थान दिलेले नाही. याबाबत मल्लिकार्जून खरगे यांना विचारण्यात आले असता त्यांनी आम्ही कोणाचेही नाव हटवले नसल्याचे सांगितले. प्रदेश काँग्रेस समितीकडून ही यादी तयार करण्यात आली आहे. तसेच या समितीकडून रिपोर्ट आल्यानंतर काहींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या