
मुंबईत कोरोना रुग्णवाढ कायम असून सोमवारी नवीन 1185 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात 300 प्रलंबित अहवालांचा समावेश असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 21 हजार 152 वर पोहोचली आहे. गेल्या एका दिवसात 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या एका दिवसांत मृत्यू झालेल्या 23 जणांमध्ये 18 पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 11 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. यामुळे मृतांचा एकूण आकडा 757 वर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या एकाच दिवसांत मुंबईत 504 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 5516 वर पोहोचली आहे.



























































