मुंबईत कोविड लसीकरण वेगात

मुंबई शहर आणि उपनगरात कोविड लसीकरण वेगात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

जसलोक रुग्णालयाच्या सहकार्याने शिवसेना-युवसेना मलबार हिल विधानसभा, जय भवानी प्रतिष्ठान, शिव क्रांती सेवा नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने ताडदेव विभागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला युवासेना सचिक करुण सरदेसाई, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, विभाग संघटक अरविद बने, विभाग संघटक सुरेखा उबाळे, शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकर, महिला शाखा संघटिका संध्या डुंमरे, शाखा संघटिका सुप्रिया शेडेकर, शाखा संघटिका नयना देहेरकर, विभागीय चिटणीस सिद्धेश जगताप, समन्वयक अनिकेत हळदक, युवती उपकिभाग अधिकारी प्रेरणा उबाळे, आमिषा पिंपळे, कल्पना सकपाळ आणि शिवसैनिक व युवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना विस्तारक-विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर व शाखा क्रमांक 215चे शाखा अधिकारी सागर शिवाजी सांबरेकर यांनी केले.

नाना पालकर स्मृती समितीतर्फे तृतीयपंथी, रेल्वे स्थानकातील बूट पॉलिशवाले यांना शनिवारी बोरिवली येथे मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर परेश नवलकर, कृष्णा महाडिक, आदित्य फडके, प्रवीण परब, मंगला मेहेंदळे, अमित झा, शर्मिला रायकर, संतोष राजवाडे, राजेंद्र कोटकर आदी उपस्थित होते.
दत्ता राऊळ मैदान गणेशोत्सव मंडळाचे मोफत लसीकरण

सामाजिक उपक्रमात नेहमी आघाडीवर असणाऱया दादर पश्चिमच्या गोखले रोड (दक्षिण) येथील दत्ता राऊळ मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कोरोना काळातील सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून मंडळाच्या वतीने 1 हजार 250 जणांना कोविशिल्ड लस मोफत देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार राऊत, प्रमुख कार्यवाह विनय चौगुले यांच्याह इतर कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. गणेशोत्सव साजरा करताना आरोग्य उत्सव साजरा करून सामाजिक परंपरा जपण्याचे काम केले असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या