Mumbai crime news – घरफोडी करणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime

देवदर्शनासाठी गेलेल्या वृद्धाच्या घरी घरफोडी करून पळून गेलेल्या सराईत आरोपीस बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. परशुराम शेंडगे असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात ओशिवरा, बांगूर नगर आणि विलेपार्ले गुन्हे शाखेत गुन्हे नोंद आहेत.

तक्रारदार हे गोरेगाव येथे राहतात. गेल्या महिन्यात ते पत्नीसोबत देवदर्शनासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरातून 10 लाखांचा ऐवज चोरला. देवदर्शनावरून ते घरी परतले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला. घडल्या प्रकरणी त्याने बांगूर नगर पोलीस ठाण्यात त्याने धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

वरिष्ठ निरीक्षक रवींद्र आव्हाड यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक संजय सरोळकर, दळवी, शिंदे, केतके, हरगुडे, जाधव आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी परशुरामला ताब्यात घेतले. त्याने घरपह्डी केल्याचे पोलिसांना सांगितले.