परदेशी विद्यार्थीनीवर बलात्कार, कफ परेड रेसिडेन्स असोसिएशन प्रमुखाला अटक

28

सामना ऑनलाईन। मुंबई

मुंबईतील उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कफ परेड येथे ब्राझिलियन विद्यार्थीनीवर (19) बलात्कार केल्याप्रकरणी कफ परेड रेसिडन्स असोसिएशन प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. पद्माकर नांदेकर (52) असे त्याचे नाव आहे.

पीडित तरुणी युथ एक्सजेंच कार्यक्रमांतगर्त सहा महिन्यांसाठी हिंदुस्थानमध्ये वास्तव्यास आली आहे. यादरम्यान, ती नांदेकर यांच्याकडे राहत होती. 15 एप्रिल रोजी नांदेकर यांनी तिला दक्षिण मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बोलावले. यावेळी नांदेकर यांनी तिला कोल्ड ड्रिंक पिण्यास दिले. पण त्यानंतर तिचे डोके गरगरू लागले व ती बेशु्ध्द झाली.

पण सकाळी शुद्धीत आल्यावर आपण हॉटेलच्या एका रुममध्ये नांदेकरांबरोबर असल्याचे तिच्या लक्षात आले. सगळा प्रकार लक्षात येताच ती वांद्रा येथे दुसऱ्या पालकांकडे निघून गेली. तिथे गेल्यावर तिने त्या कुटुंबीयांना झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले. त्यांनी तिला हिंमत दिल्यानंतर तीने कफ परेड पोलीस ठाण्यात नांदेकरांविरोधात तक्रार नोंदवली. नांदेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 मे पर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या