मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेची रंगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या वतीने 6 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान डॉ. खरुडे मंडई हॉल, आदर्श नगर, प्रभादेवी, मुंबई – 30 येथे दशरथ येलवे स्मृती चषक सब ज्युनियर व ज्युनियर व प्रदीप जाधव स्मृती चषक सीनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यापैकी 6 जानेवारी रोजी सकाळी 10 पासून ते 7 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत कनिष्ठ गटांच्या 12 वर्षांखालील कॅडेट मुले व मुली, 14 वर्षांखालील मुले व मुली, 18 वर्षांखालील मुले व मुली तसेच 21 वर्षांखालील युथ मुले व मुली या गटांतील स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. 7 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा सुरू करण्यात येणार असून यामध्ये पुरुष एकेरी, महिला एकेरी, 50 वर्षांवरील वयस्कर पुरुष व महिला एकेरी तसेच आंतर संस्था ‘अ’ गट, ‘ब’ गट, ‘क’ गट व आंतर क्लब अशा एकंदर आठ गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. इच्छुक खेळाडूंनी आपली नावे आपल्या क्लबमार्फत सायंकाळी 6 ते 8 दरम्यान जी – बी – 4, बाळ गोविंददास सोसायटी, मनोरमा नगरकर मार्ग, स्टार सिटी सिनेमाजवळ, शिवाजी पार्क, मुंबई – 16 येथे नोंदवावीत.