18 जानेवारीला ‘मुंबई ड्रम डे 2019’

18

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मुंबई ड्रम डे 2019’ हा ड्रम सेटना समर्पित कार्यक्रम शुक्रवारी 18 जानेवारी रोजी वांद्रे पश्चिम येथील सेंट अँड्रय़ुज ऑडिटोरियममध्ये सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. देशातील आघाडीचे कलाकार आणि सर्केत्कृष्ट ड्रमर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिवमणी, जीनो बँक्स, कॅसी लोबो, प्रँन्को वाझ, लिंडसे डिमेलो यांच्यासह विभास राहुल (टी 2), जीवराज स्टॅन्ली जॉर्ज, जोशुआ ग्रँट आणि ऍरोन नायरो यांचा समावेश यात असेल. ‘मुंबई ड्रम डे 2019’चे आयोजन आणि व्यवस्थापन द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी संयुक्तरीत्या केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका www.bookmyshow.com या वेबसाईटवर तसेच कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 10.30 पासून सेंट अँड्रय़ूज ऑडिटोरियम येथे मिळतील. संपर्क 26459667

आपली प्रतिक्रिया द्या