मुंबई इंग्लिश एज्युकेटर्स टीमचे वेबिनार्समधून शिक्षकांना मार्गदर्शन

452

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गेले साडेतीन महिने शाळा बंद आहेत. मात्र, 14 जूनपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही मार्गदर्शन करावे, यासाठी मुंबई इंग्लिश एज्युकेटर्स टीमने (मीट) 15 जूनपासून शिक्षकांसाठी पहिली ऑनलाइन वेबिनार्स सिरीज सुरू केली. यात शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने 13 वेबिनार्स घेण्यात आलीत.

मुंबई इंग्लिश एज्युकेटर्स टीमने सुरू केलेल्या वेबिनार्समधून पुस्तकातील अभ्यास कसा शिकवावा, तंत्रज्ञानाचा शिकवताना उपयोग कसा करावा, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या वर्गात शिकवताना कोणते तंत्र वापरावे, लेखन कौशल्य कसे विकसित करावे, कविता कशा प्रकारे शिकवाव्यात, सर्वसमावेशक वर्ग शिकवण्याची पद्धत कशी असावी, विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य कसे विकसित करावे, पेपर सोडवताना येणाऱया समस्यांवर मात करून विद्यार्थ्याला जास्त गुण कसे मिळवता येतील, फोनिक्सच्या आधारे व्याकरणातील मूलभूत संकल्पना कशा विकसित कराव्यात तसेच कोरोनानंतर शिक्षकाची भूमिका कशी असावी, अशा विविध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेबिनार्समध्ये प्राचार्य आणि मीटचे अध्यक्ष सुदाम kgभार, सचिव प्राचार्य अखिल राजेभोसले, प्राचार्या शमिका आजगावकर तसेच ब्रिटिश काऊन्सिलचे मास्टर ट्रेनर सचिन म्हात्रे, संतोष कंदलकर तसेच प्रशिक्षिकांनी मार्गदर्शन केले. दुसरी वेबिनार्स सिरीज 16 जुलै ते 15 ऑगस्ट सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या