मीरा रोड कॉल सेंटर घोटाळ्यावर चित्रपट येणार

सामना ऑनलाईन। मुंबई

अमेरिकेला हादरवणाऱ्या 2016 सालच्या कॉल सेंटर घोटाळ्यावर आता चित्रपट बनवण्यात येणार आहे. निर्माते फिरोज नाडीयादवाला हा चित्रपट बनवणार आहे. मीरारोडमध्ये हे कॉल सेंटर चालवले जात होते. स्वत:ला अतिहुशार समजणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांना मुंबईतल्या मिसरूडही न फुटलेल्या युवकांनी करोडो रुपयांचा चुना लावला होता. ही कल्पना चित्रपटासाठी अत्यंत चांगली आहे असा वाटल्याने या घोटाळ्यावर चित्रपट करण्याचं नाडियादवाला यांनी ठरवलं आहे.

बोगस कॉल सेंटर चालवून ५०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या सागरला अटक

मीरा रोड आणि आसपासच्या भागातून बोगस कॉल सेंटर चालवण्यासाठी सागरने तरुणांचे एक टोळके तयार केले होते. चांगला पगार मिळत असल्याचा विचार करुन टोळक्यातील तरुण सागरच्या आदेशानुसार अमेरिकेतील विविध भागांमध्ये राहणाऱ्यांना फोन करत होते. उत्तम इंग्रजी बोलून समोरच्यावर प्रभाव टाकायचा आणि आपण अमेरिकेच्या सरकारी विभागातून बोलत असल्याचे सांगत कर न भरल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई करत असल्याची बतावणी करायची. बनावट माहिती देऊन दंडाच्या नावाखाली फसवून लुटायचे या पद्धतीने सागरची कंपनी अमेरिकेतील नागरिकांना लुटत होती. काही वेळा कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरले नाही म्हणून कारवाई करत असल्याची बतावणी करुन लुटले जायचे. सागर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून सुमारे ५०० कोटींचा आर्थिक घोटाळा केला.

अमेरिकन नागरिकांबरोबर कसे बोलायचे, त्यांच्यावर महसूल तात्काळ भरण्यासाठी कसा दबाव आणायचा. याचे खास प्रशिक्षण टेली कॉलर्सला देण्यात आले होते. या भामटेगिरीतून मिळणाऱ्या पैशांवर सागरने तब्बल अर्धा डझन कॉल सेंटरर्स सुरू केली होती. डॉलर्समध्ये पैसा मिळत असल्याने तो फॉर्मात होता. महागडे कपडे, आलिशान घर. बंगले, परदेश वाऱ्या, अशी त्याची लाईफ स्टाईल झाली होती. त्याने 300 दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा केला होता.

ठाण्याचा सुपरकॉप मुंबईत…

सागर स्वत;ला सेलिब्रिटी समजू लागला होता. त्याने घोटाळ्यातून कमावलेल्या पैशातून हिंदुस्थानचा कप्तान विराट कोहली याच्याकडून त्याची गाडी अडीच कोटींना विकत घेऊन ती मैत्रिणीला भेट म्हणून दिली. याच गाडीमुळे तो पोलिसांच्या रडारावर आला होता. मीरा रोड सारख्या सामान्य ठिकाणी राहणाऱ्या या मुलाकडे एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांची नजर होती. तपासादरम्यान तो अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली व योग्य वेळी मुसक्या आवळल्या.