हुतात्मा चौक, माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ होणार पालिकेचे पहिले भूमिगत पार्किंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी पालिका ‘ए’ वॉर्डमधील हुतात्मा चौक आणि माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईतील पहिले भूमिगत पार्किंग सुरू करणार आहे. यामध्ये फ्लोरा फाऊंटन, हुतात्मा चौकाजवळील अप्सरा पेनशॉपसमोरील वाहतूक बेटाजवळ 200 गाडय़ांसाठी, तर सेंट्रल रेल्वे माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ 400 गाडय़ांसाठी भूमिगत पार्किंगची सोय होणार असल्याचे पालिका उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले. मुंबईत पार्किंग सुविधांच्या मर्यादेमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. पार्किंगसाठी खासगी जागांसह पे अँड पार्किंग आणि पालिकेचे 32 वाहनतळ अपुरे पडतात. त्यामुळे मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. यामध्ये भूमिगत पार्किंग उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.