विनयभंग करणाऱया जिम ट्रेनरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली येथे एका जिममध्ये महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी जिम ट्रेनरला अटक केली आहे.

महिला ही कांदिवली येथील एका जिममध्ये जात होती. गेल्या आठवडय़ात जिम ट्रेनरने महिलेला नकोसा स्पर्श करून तिचा विनयभंग केला.याप्रकरणी महिलेने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जिम ट्रेनरविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी ट्रेनरला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.