लाचप्रकरणी माजी पोलिसाची निर्दोष मुक्तता! गुन्हा सिद्ध करण्यास पोलीस अपयशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

350 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आलेल्या माजी पोलीस कर्मचाऱयाची मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 24 वर्षांनी निर्दोष मुक्तता केली आहे. गुन्हा सिद्ध करण्यास पोलीस अयशस्वी ठरले आहेत असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्तींनी सुटका केली.

नाशिकच्या येवला तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या दामू आव्हाड यांना 1988 साली लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. 1998 साली आव्हाड यांना नाशिक सत्र न्यायालयाने 1 वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.