मेट्रोमुळे अग्यारींना धोका नाही, उच्च न्यायालयाचा ग्रीन सिग्नल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
metro-file-photo

सामना प्रतिनिधी । मुंबई

मेट्रोच्या खोदकामामुळे दक्षिण मुंबईतील अग्यारींना कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मेट्रोचे काम करणाऱया एमएमआरडीएला दिलासा दिला. भुयारीकरणाच्या कामाला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने निकाली काढतानाच येथील हेरीटेज इमारतींना धोका पोहोचू नये यासाठी व्हीजेटीआयतील तज्ञांच्या उपस्थितीत काम सुरू ठेवा असे एमएमआरडीएला बजावले. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या

मेट्रो-3च्या भुयारीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुलाबा ते सीप्झ मेट्रो-3चे काम युद्धपातळीवर सुरू असून त्याकरिता दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथे मेट्रोच्या भुयारासाठी ड्रिलिंग व खोदकाम करण्यात येत आहे. या कामामुळे प्रिन्सेस स्ट्रीट आणि काळबादेवी येथील पारशांचे धार्मिक स्थळ असलेल्या अग्यारींच्या दिवाळाला तडे गेले आहेत. या कामामुळे भूगर्भातील पाण्याचा प्रवाह बदलून येथील पवित्र विहिरीही कोरडय़ा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोचे काम थांबविण्यात यावे याकरिता पारसी समुदायाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.