
आठ सामने जिंकणारा गुजरातचा संघ आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी शुक्रवारी मुंबईशी भिडणार आहे. गुजरातचा प्ले ऑफ लढा उधळून लावण्यासाठी स्फूर्तिदायक मुंबईचा संघ आपल्या घरच्या वानखेडेवर सज्ज झालाय. मुंबईला प्ले ऑफचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी गुजरातविरुद्ध विजय मिळवावाच लागणार आहे. त्यामुळे वानखेडेवर प्ले ऑफच्या लढयासाठी उभय संघात जोरदार लढाई होणार, हे निश्चित आहे.
गुजरातची गोलंदाजी मुंबईसाठी डोकेदुखी
गुजरातचे फलंदाजच नव्हे तर गोलंदाजही सर्वांसाठी डोकेदुखी ठरलेत. मोहम्मद शमी, राशीद खान हे दोघे 19 विकेट घेत सर्वांत वर आहेत. त्यांची गोलंदाजी खूप धोकादायक ठरली आहे. उद्या मुंबईसाठीसुद्धा ते धोकादायक आहेत. त्यातच नूर अहमदही त्रासदायक ठरतोय. त्याच्या हल्ल्याने गेल्या वेळी मुंबई हादरली होती. आताही तीच परिस्थिती आहे. हे गोलंदाजच गुजरातची खरी ताकद आहेत, हे सांगण्याची आवश्यकताच उरलेली नाही.
मुंबईची फलंदाजी सूर्यावर
रोहित शर्माच्या अपयशामुळे मुंबईची फलंदाजी सूर्यकुमार यादवच्या झंझावातावर पूर्णपणे अवलंबून आहे. सूर्याच्या स्पह्टक फलंदाजीमुळे बंगळुरूविरुद्ध मुंबईने दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे मुंबई संघात चैतन्य संचारले असून उद्या तिलक वर्मामुळे मुंबईची फलंदाजी आणखी बळकट झाली आहे. दुखापतीमुळे तिलक गेले दोन्ही सामने खेळू शकला नव्हता. त्यामुळे उद्या रोहित शर्माला सूर गवसला तर मुंबईला गुजरातपुढे द्विशतकी आव्हान सहज उभारता येईल. ईशानच्या जोडीला नेहाल वढेराच्या फलंदाजीनेही मुंबईला स्फूर्ती दिली आहे. त्यामुळे वानखेडेवर मुंबई स्फूर्तिदायक विजय मिळवेल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईला स्थान राखायचेय
बंगळुरूविरुद्धच्या विजयाने मुंबईने आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी केलीय. शुक्रवारीही त्याचीच पुनरावृत्ती करत त्यांना आपले गुणतालिकेतील तिसरे स्थान कायम राखायचेय. जर गुजरात जिंकला तर त्याचे प्ले ऑफ निश्चित होईल आणि मुंबईचे स्थान डळमळीत होईल. त्यामुळे विजय मिळवून मुंबईला प्ले ऑफच्या दिशेने पाऊल टाकायचेय.
आयपीएल गुणतालिका
संघ सा. वि. प. ने. र. गुण
गुजरात 11 8 3 0.951 16 चेन्नई 12 7 4 0.493 15
राजस्थान 12 6 6 0.633 12
मुंबई 11 6 5 -0.255 12
लखनौ 11 5 5 0.294 11
बंगळुरू 11 5 6 -0.345 10
कोलकाता 12 5 7 -0.357 10
पंजाब 11 5 6 -0.441 10
हैदराबाद 10 4 6 -0.472 8
दिल्ली 11 4 7 -0.605 8
टीप- सा-सामना, वि-विजय, प-पराजय,ऩे र.- नेट रनरेट
ही आकडेवारी राजस्थान – कोलकातापर्यंतची आहे.
अव्वल फलंदाज
फलंदाज सा. धावा सरासरी 4 6
डय़ुप्लेसिस 11 576 57.60 45 32
जैस्वाल 12 575 52.27 74 26
शुभमन 11 469 46.90 49 13
कॉन्वे 12 468 52.00 55 13
कोहली 11 420 42.00 39 11
अव्वल गोलंदाज
गोलंदाज सा. वि. सरासरी 4 वि. 5 वि.
चहल 12 21 16.89 3 0
शमी 11 19 16.36 1 0
राशीद 11 19 18.73 0 0
देशपांडे 12 19 21.78 0 0
चावला 11 17 18.88 0 0




























































