
ज्या गोष्टीची शंका होती तेच झाले. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएलपासून बाहेर गेला आहे. अनफिट असल्यामुळे निराशाजनक कामगिरी करत असलेल्या आर्चरने अखेर मायदेशी परतण्यातच धन्यता मानल्यामुळे मुंबईचे त्याच्यावर लावलेले आठ कोटी पाण्यात गेले आहेत. आता त्याच्या जागी इंग्लंडच्याच ख्रिस जॉर्डनची वर्णी लागली आहे.

























































