
जोगेश्वरी येथील एका खासगी संस्थेतून दोन मुलांनी पलायन केल्याची घटना समोर आली आहे. घडल्या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जोगेश्वरी पूर्व येथे एक खासगी संस्था आहे. त्या संस्थेत अनाथ मुलांना ठेवले जाते. तसेच पोलीस आणि बाल कल्याण समितीमार्फत येणाऱया मुलांचा तेथे सांभाळ केला जातो. संस्थेच्या गेटवर सुरक्षारक्षक तैनात असतात. नुकतेच संस्थेत मुलांना जेवण देण्यात आले होते. जेवणानंतर संस्थेतील केअरटेकरने मुलांची संख्या मोजली असता दोन मुले संस्थेत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर केअर टेकरने इतर कर्मचाऱयांच्या मदतीने त्या मुलांचा शोध घेतला असता ती मुले सापडली नाही. त्या दोघांनी संस्थेच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याचे तपासात समोर आले आहे.





























































