मुंबईचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी रस्त्यांचे चौक, वाहतूक बेटे पालिकेच्या माध्यमातून सुशोभित आणि आकर्षक बनवण्यात येत आहेत. यात आता उपनगरातील सहा महत्त्वाच्या जंक्शनना नवी झळाळी देण्यात येणार आहे. यासाठी पालिका 19 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.
या कामात पथदिवे लावणे, माहिती फलक, आसन व्यवस्था करणे, वाहनांसाठी पार्ंकगची सोय उपलब्ध करून देणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी वृक्षारोपण, हिरवळ तयार करण्याचीही कामे केली जाणार आहेत. बस थांब्यांचे नियोजन करताना रिक्षा, टॅक्सी स्टॅड नियोजनबद्ध रीतीने करण्यात येतील. पादचाऱयांसाठी प्याऊ तयार करण्यात येईल. पालिकेच्या या उपक्रमात चौकांचे लॅण्डस्केपिंग करण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी रुंदीकरणासह सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. यात वाहनांबरोबर पादचाऱयांचाही विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. पश्चिम उपनगरातील चार आणि पूर्व उपनगरातील दोन चौकांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 25 कोटी 71 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र या कामासाठी पात्र कंत्राटदारांनी 24.10 टक्के कमी दराने 19 लाख 51 हजार रुपयांत हे काम करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीमार्फत उपनगरातील चौकांचे रूप पालटण्यासाठी 35 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या चौकांचे होणार सुशोभीकरण
n जुहू-विलपार्ले जंक्शन
n जोगेश्वरी-विक्रोळी आणि साकी विहार रोड जंक्शन
n महात्मा गांधी रोड आणि साकी विहार जंक्शन मथुरासाद मार्गपर्यंत साकी विहार रोड जंक्शन कांदिवली
n मुलुंड आर्य समाज चौक
n अंधेरी-घाटकोपर जोड रस्त्यावरीर साकीनाका जंक्शनपासून पश्चिम द्रुतगर्ती मार्ग मेट्रो स्थानकापर्यंत

























































