
सामना प्रतिनिधी। मुंबई
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मुंबईवासीय शिवसैनिकांचा मेळावा मंगळवार, 9 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता शिवसेना भवन येथे होणार आहे.
या मेळाव्यासाठी रत्नागिरी जिह्यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर तालुक्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते सुभाष देसाई आहेत. कार्यक्रमाला विभागीय समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्पप्रमुख सुधीर मोरे, रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जाधव आणि जिह्यातील सर्व विधानसभा संपर्पप्रमुख उपस्थित राहणार आहेत.

























































