सणासुदीनिमित्त रेल्वेतर्फे मुंबई-मडगाव 300 दिवाळी स्पेशल गाड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने दिवाळी आणि नाताळच्या सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते मडगाव दरम्यान 300 विशेष रेल्वेगाडय़ा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा संपूर्णपणे आरक्षित असतील त्यांचे बुकिंग 31 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

मुंबई – मडगाव विशेष ट्रेन (150 फेऱया) ट्रेन क्र. 01112 – ही मडगाव ते मुंबई ट्रेन दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 14 जानेवारी 2021 दरम्यान (75 फे-या) मडगाव येथून दररोज सायं. 6 वा. सुटेल आणि दुसऱया दिवशी सकाळी 5.50 वाजता सीएसएमटी पोहोचेल.

ट्रेन क्र. 01111 – मुंबई ते मडगाव ट्रेन दि. 2 नोव्हेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 दरम्यान (75 फेऱया) सीएसएमटी येथून दररोज रा. 11.05 वाजता सुटेल आणि दुसऱया दिवशी सकाळी 10.45 वाजता मडगावला पोहोचेल.
डब्याची रचना – 1 प्रथम सह द्वितीय वातानुकूलित, 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान आणि 4 द्वितीय आसन श्रेणी.

मुंबई – मडगाव विशेष ट्रेन (150 फेऱया) ट्रेन क्र. 01114 – मडगाव ते मुंबई ट्रेन दि. 2 नोव्हेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 दरम्यान (75 फेऱया) मडगाव येथून दररोज सकाळी 09.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रा. 9.40 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

ट्रेन क्र.01113 – मुंबई ते मडगाव ट्रेन दि. 2 नोव्हेंबर 2020 ते 15जानेवारी 2021 दरम्यान (75 फेऱया) सीएसएमटी येथून दररोज सकाळी 07.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रा.7.00 वाजता मडगावला पोहोचेल.

डब्याची रचना – पूर्ण आरक्षित 01111 आणि 01113 उत्सव विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग. संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in. या वेबसाइटवर दि. 31ऑक्टोबर पासून सुरू होईल.