
मुंबईसह महाराष्ट्रातील तापमान मार्च महिन्यात वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबईसह राज्यातील काही भागात उन्हाची तलखी आतापासूनच वाढायला सुरुवात झाली असून यंदाचा उन्हाळा भीषण असणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईचे कमाल तापमान 35 ते किमान तापमान 21 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर मुंबईतील आर्द्रता 87 टक्के नोंदविण्यात आली आहे.
राज्यात रत्नागिरीचे कमाल तापमान 36.2 तर अकोला येथील कमाल तापमान 37.1 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात यंदाचा उन्हाळा कडक असणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्या, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

























































