
अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार मेळावा 2021 चे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा व कार्य गौरव पुरस्काराचे आयोजन मंगळवारी नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी मालाडच्या जागृती पराग पाटील यांना राष्ट्रीय सेवा व कार्य गौरव पुरस्काराने निवडपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी समाज व राष्ट्र यांच्याप्रती समर्पित राहून निरपेक्षपणे केलेल्या कार्याला पत्रकार संघातर्फे अभिवादन करीत असून हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याला मिळालेली लोकमान्यतेची पावती होय, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याणमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर सतीश नाना कुलकर्णी, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, संपादक आशीष जाधव आदी उपस्थित होते.



























































