पुरुष धावले हक्कांसाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन। मुंबई

मुंबईत नुकत्याच झालेल्या मुंबई मॅरेथान स्पर्धेत पुरुषांनी मोठया प्रमाणावर सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘वास्तव फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी सहभाग घेतला होता.

final-1

यावेळी त्यांनी पुरुष आयोगाची जोरदार मागणी केली. पुरुषांच्या अडचणी व समस्यांकडे कायम दुर्लक्ष केले जाते. म्हणून याबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठीच आम्ही या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्याचे संस्थेचे प्रमुख अमित देशपांडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लैंगिक समानतेचा मुद्दयाकडेही लक्ष वेधले.