
1 / 10
मुंबई मेट्रो 3 च्या भुयाराचे काम पूर्ण झाले असून त्या समारंभाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.
या ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदार होतो ही माझ्यासाठी अभिमानाची बात असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
मेट्रो-3 मध्ये 27 स्थानके असून मेट्रो-3 चे 78% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. तसेच संपूर्ण प्रकल्पाचे 55% काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 2021 पर्यंत दररोज 13.9 लाख प्रवासी मेट्रो-3 ने प्रवास करण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईतील गर्दीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

























































