
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रंगत आता वाढली असून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शाखा भेटी देत मतदारांशी संवाद साधला जात आहे. शिवाय शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि ‘मनसे’चे नेते अमित ठाकरे हेदेखील शाखा भेटी, मतदारांशी संवाद साधत असल्याने युतीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

शीव कोळीवाडा प्रभाग क्र. 173 शिवसेनेच्या उमेदवार प्रणिता वाघधरे यांच्या निकडणूक कार्यालयाचे उद्घाटन रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना नेते–खासदार अनिल देसाई, विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, संघटक प्रीतम निंबळकर, प्रभाकर भोगले, शारदा गोळे, संगीता झेमसे, कासंती दगडे, पूजा कसपले, संजय भोगले व लकू नर यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.

शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी युतीचे प्रभाग क्र. 86चे उमेदवार क्लाईव्ह डायस यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते गुरुनाथ खोत उपस्थित होते. शिवसेनेच्या माध्यमातून झालेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार, कार्यकर्त्यांना केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभाग क्र. 12 मधील युतीच्या उमेदकार शिकसेनेच्या सारिका झोरे यांच्या प्रचारार्थ निकडणूक कार्यालयास भेट दिली. याकेळी मनसे सरचिटणीस नयन कदम, शिवसेना महिला किभागसंघटक शुभदा शिंदे, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, अकधूत चक्हाण, सचिन मोरे, योगेश देसाई, जतीन पकार, सुनीता मोरे, मिलिंद साटम, तुकाराम पालक, दीपाली मराठे, मंजू लोहार उपस्थित होते.

प्रभाग क्र. 166 मधील शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मनसेचे राजन खैरनार यांच्या निवडणूक कार्यालयाला आदित्य आणि अमित ठाकरे यांनी भेट दिली असता कार्यकर्ते, मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आदित्य आणि अमित ठाकरे येताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. पालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवणार, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रभाग क्र. 91 चे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचे उमेदवार मनसेचे कृष्णा म्हाडगुत यांच्या निवडणूक कार्यालयाला शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी आमदार संजय पोतनीस, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्यासह पदाधिकारी–कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

प्रभाग क्र. 118 च्या शिवसेना उमेदवार सुनीता जाधव यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांनी केले. यावेळी आमदार सुनील राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनोज चव्हाण यांच्यासह मनसे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


























































