IIT बॉम्बेचे नाव IIT मुंबई केले नाही, यासाठी देवाचे आभार; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

भाजपला मुंबई विषयी असलेला सुप्त राग आणि द्वेष पुन्हा एकदा आला समोर आलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात जितेंद्र सिंग म्हणाले आहेत की, “आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई केले नाही, यासाठी मी देवाचे आभार मानतो.”

जितेंद्र सिंग यांच्या या वक्तव्याने एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वक्तव्य केल्यानंतर पुढे ते म्हणाले आहेत की, “आयआयटी मद्राससाठीही हेच म्हणावे लागेल.” दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक नेटकरी यांनी टीका करत संताप व्यक्त केला आहे.