
गोरेगावमधील दिंडोशी परिसरात खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आगीची घटना शनिवारी घडली. लेवल 2 ची ही आग असून यात 5 ते 6 सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. फर्निचर मार्केटमधील 5 ते 6 दुकानांमध्ये आग परसली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही.