
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या 12.20 किलोमीटर लांबीच्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यामध्ये येणारा 5.30 किमीचा महाकाय बोगदा खोदण्यास आज सुरुवात झाली. या टनेल बोअरिंग मशीनला ‘तुळशी’ नाव देण्यात आले आहे. या महाकाय बोगद्यात प्रत्येकी तीन लेनचा दुहेरी बोगदा बांधण्यात येणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता पालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रकल्प टप्पा 3 (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिम येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीनने प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. या बोगद्यांच्या बांधकामादरम्यान पर्यावरण आणि जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये 17 क्रॉस पॅसेज, 720 मीटर लांबीचे दुहेरी पेटी बोगदे, गोरेगाव व मुलुंड येथे 600 मीटर लांबीचे पोहोच रस्ते यांचा समावेश असून प्रकल्पाची एपूण लांबी 6.62 किलोमीटर आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी पंत्राटदारावर आहे.
पर्यावरण विभागाची मंजुरी
प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून टप्पा-1 व टप्पा-2 अंतर्गत आवश्यक पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आवश्यक वृक्षतोड परवानगी मिळाली आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे 906 प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे 23 मजली अशा सहा इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे.
दीड तासाचा प्रवास 20 मिनिटांत
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्यात थेट संपर्प होईल. त्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांतील वाहतूक काsंडीत लक्षणीय घट होऊन प्रवासाचा कालावधी सुमारे 90 मिनिटांवरून अवघ्या 20 मिनिटांपर्यंत कमी होईल. ज्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार असून वाहतूककाsंडी फुटण्यास मदत होणार आहे.



























































