
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 476रुग्ण कोरोनामुक्त झालेतर 558 कोरोनाचे रुग्ण सापडले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 555दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणार्या 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या 11 हजार 400 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 95 हजार 521 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 555दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 369 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 29 लाख 49 हजार 675 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 13 हजार 206वर पोहोचली आहे.
राज्यात दिवसभरात 2,421 कोरोनामुक्त
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज 2 हजार 421 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95.7 टक्क्यांवर पोहोचला आहे.राज्यात दिवसभरात 3हजार 451 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.50 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 51 लाख 8 हजार 645 चाचण्या झाल्या असून 20 लाख 52 हजार 253 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 65 हजार 992 जण होम कोरेंटाईन असून 1 हजार 852 जण संस्थात्मक कोरेंटाईन आहेत.
























































