रात्री दिसत नाही म्हणून करायचा सकाळी घरफोडय़ा, झोपडपट्टय़ांमध्ये करायचे रेकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरफोडीच्या गुन्ह्यात वाकोला पोलिसांनी राकेश खरटमोल, रोहित राठोड आणि रमजान अली ऊर्फ करामत अली तिघांना अटक केली. करामत अलीला रात्रीचे दिसत नसल्याने तो सकाळच्या वेळेस चोऱया करायचा. चोरलेल्या सोन्याच्या वस्तू घेऊन तो एक्प्रेसने अहमदाबादला पत्नीकडे जात असायचा. अहमदाबादला त्याची पत्नी चोरीचे दागिने ज्वेलर्सला विकते.

सांताक्रुझ पूर्व परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्य़ा होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. परिमंडळ-8 चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुनयना नटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेश सिंदे, उपनिरीक्षक नितीन सवणे, सौंदणकर, पाटील, पोटे, बारवरकर, मिस्त्री यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी करामत अलीला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने वाकोला परिसरात घरफोडय़ा केल्याची कबुली पोलिसांना दिली. करमत अली हा धारावी परिसरात राहतो. त्याला रात्रीचे दिसत नसल्याने तो सकाळीच नशा करून घरपह्डय़ा करतो. घरपह्डी केल्यानंतर तो दागिने पत्नीला देण्यासाठी अहमदाबादला जातो. तेथे त्याची बायको ज्वेलर्सला ते चोरीचे दागिने विकते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार राकेश आणि रोहित हेदेखील जेव्हा संधी मिळेल तेव्हा घरफो़ड्य़ा करतात. चोरीचे दागिने हे मित्राच्या मदतीने ज्वेलर्सला विकतात. पत्नीसोबत भांडण झाले असून ते दागिने विकायचे आहेत अशा भूलथापा ते दोघे मारतात. त्या तिघांकडून पोलिसांनी साडेआठ लाख रुपयाचे दागिने जप्त केले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यात त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोपटपानाचा वापर

घरफोडी करण्यासाठी ते तिघे सांताक्रुझ, खार, निर्मलनगर येथील झोपडपट्टींमध्ये जात असायचे. तेथे रेकी केल्यानंतर घरपह्डी करायचे. अटक आरोपीकडून पोलिसांनी एक घरफोडीच्या गुन्ह्यात वापरला जाणारा पोपटपाना जप्त केला आहे. पोपटपानामुळे दरवाजाची कडी सहज उघडली जाते.

मुंबईत विविध ठिकाणी 35 गुन्हे

घरपह्डीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने राकेश आणि रोहितला ताब्यात घेतले. ते दोघे रेकॉरर्डवरचे आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत 30-35 गुन्हे दाखल आहेत.