मुंबई- पुणे रेल्वेमार्ग सव्वा तासापासून ठप्प

514

मुंबई- पुणे रेल्वेमार्ग गेल्या सव्वा तासापासून ठप्प आहे. ठाकूरवाडी ते मंकी हिलदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रीक बिघाड झाल्याने हा मार्ग ठप्प आहे. हा मार्ग ठप्प असल्याने कन्याकुमारी एक्सप्रेस मध्येच थांबवण्यात आली आहे. तर प्रगती एक्सप्रेस कर्जत रेल्वेस्थानकात थांबवण्यात आली आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेसही थांबवण्यात आली आहे. हा रेल्वेमार्ग ठप्प झाल्याने मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, काम कधी पूर्ण होईल, याबाबातची माहिती मिळालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या