
सामना ऑनलाईन। मुंबई
गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर येथे पत्रकार आदर्श मिश्रा यांचा सात मजली इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाला आहे. ते दररोज गच्चीवर मॉर्निंग वॉकसाठी जात असत. रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना तोल गेल्याने ते गच्चीवरून खाली पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यामागे घातपात असल्याची शक्यता त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. मिश्रा यांनी अनेक इंग्रजी वर्तमानपत्रात काम केले होते. सध्या ते एका मॅगझिनमध्ये वरिष्ठ पदावर काम करत होते.





























































