
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जोरदार साजरा झाला. पण, मुंबईत उन्हाची प्रचंड काहीली आणि उकाडय़ाने हैराण झालेली अनेक जोडपी हिमाचल किंवा जम्मू कश्मीरकडे रवाना झाली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ही ठिकाणे पर्यटकांनी अक्षरशः गजबजून जातात. सध्या उत्तरेत तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी तसेच हनीमुनसाठीही बुकाRग जोरात आहे. पण, आता तिकडे जाण्याची गरज नाही. कारण, सध्या मुंबईतच हनीमुनी हवा वाहत आहे. उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी होत असून तेथून येणाऱया बोचऱया वाऱयांमुळे मुंबई चांगलीच गारठली आहे. दोन दिवसात मुंबईचे किमान तापमान 17 डीग्री सेल्सियसपर्यंत तर कमाल तापमान 28 डीग्री सेल्सियसपर्यंत घसरले आहे.
जॉगिंग ट्रक हाऊसफुल्ल
मुंबईतील गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी जॉगिंग ट्रक हाऊसफुल्ल झाल्याचे आणि सायंकाळी ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटत असल्याचे चित्र आहे. भायखळ्याचा राणीचा बाग, बोरीवलीचे नॅशनल पार्क, ठाण्यातील येऊर ही ठिकाणे रविवारी गजबजलेली दिसली. सायंकाळच्या आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नाना-नानी पार्क, विविध उद्याने पर्यटकांनी भरून वाहत असल्याचे चित्र आहे.
राज्यभरातही गारठा वाढला
राज्यभरातही अनेक ठिकाणी किमान पारा 12 ते 14 पर्यंत घसरल्याची नोंद सोमवारी झाली. शनिवार आणि रविवारीही हुडहुडी भरवणारी थंडी पडली होती.
पुढचे तीन दिवस थंडीचेच
गायब झालेली थंडी पुन्हा पडली असून पुढचे दोन दिवस म्हणजेच 7 मार्चपर्यंत मुंबईसह राज्यभरात विविध भागात बोचरी थंडी असेल असे राज्याच्या कृषी हवामान विभागाचे माजी संचालक आणि हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. 8 तारखेपासून मात्र पारा पुन्हा चढेल आणि कडक उन्हाळा सुरू होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
































































