
सांताक्रुझच्या एअर इंडिया ग्राऊंडवर चार दिवस भरवण्यात आलेली मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमिअर लीग-सीजन-2 म्हणजे भव्यदिव्य, शिस्तबद्ध स्पर्धा असून त्यामुळे टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱया तरुणांसाठी हे एक सर्वोत्तम व्यासपीठ आहे. सुप्रिमो ट्रॉफीकडून गेले 9 वर्षे क्रिकेट स्पर्धांचे नीटनेटके आयोजन केले जात आहे. अशा प्रकारचे सुप्रिमो ट्रॉफीचे आयोजन मलेशिया, थायलंड, दुबईसारख्या देशांमध्येही केले गेले पाहिजे. त्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था आम्ही करू, असे गौरवोद्गार दुबईतील ग्लोबल जनरल ट्रेडिंग एचएलएमचे प्रमुख झहूर सय्यद यांनी काढले. मुंबई टेनिस क्रिकेट प्रिमीअर लीग(सीजन-2)चा समारोपावेळी ते बोलत होते. यावेळी सुप्रिमो ट्रॉफीचे सर्वेसर्वा आमदार, विभागप्रमुख संजय पोतनीस उपस्थित होते.
सांताक्रुझच्या एअर इंडिया ग्राऊंडवर 8, 9,10 आणि 11 डिसेंबरला मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमीअर लीगचे ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनकडून आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन आणि मार्गदर्शन सुप्रिमो ट्रॉफीच्या माध्यमातून विभागप्रमुख, आमदार संजय पोतनीस यांनी केले. या स्पर्धेत मुंबईतील 12 संघ आणि 192 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी 410 जणांनी नोंदणी केली होती त्यातून या 192 खेळाडूंचा लिलाव करून निवड करण्यात आली होती. नवोदित खेळाडूंना संधी देण्यासाठी सर्व संघात 22 वर्षांच्या दोन खेळाडूंचा खेळवणे बंधनकारक केले होते. मिळालेल्या संधीचे सोने करत नव्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत सगळ्यांची मने जिंकली. सुप्रिमो ट्रॉफीसाठी दुबईतील माझा प्ले ही पंपनी प्रायोजक होती. यावेळी प्रमुख पाहुणे ग्लोबल जनरल ट्रेडिंग एचएलएमचे प्रमुख झहूर सय्यद आणि त्यांच्या सहाय्यक नगमा यांनी समारोपावेळी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला. गेले 9 वर्षे सुप्रिमो ट्रॉफीच्या आयोजनामुळे त्याला जागतिक वलय निर्माण झाले असून ही स्पर्धा यू टय़ूबावरून जगभरात पाहिली गेली.
मुंबईत टेनिस बॉल क्रिकेट खेळाला ओहोटी लागली होती. त्याला पुन्हा नवसंजीवनी द्यावी, त्यातून नवीन खेळाडू पुढे यावेत तसेच गल्लीबोळात खेळल्या जाणाऱया या खेळाला एका छताखाली आणण्यासाठी सुप्रिमो फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमिअर लीग-सीजन-2 सुप्रिमो चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला सर्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
– संजय पोतनीस, सुप्रिमो ट्रॉफी, प्रमुख
अंतिम फेरी – अंधेरी अॅव्हेजर्स विरुद्ध फिरोज वॉरियर्स,
विजेता संघ –
अंधेरी अॅव्हेजर्स, बक्षीस 5 लाख
उपविजेता संघ –
फिरोज वॉरियर्स, 3 लाखांचे बक्षीस
मॅन ऑफ द सिरीज
प्रथमेश बेलछेडा, आयनॉक्स टीम, बाईक बक्षीस
सर्वोत्तम बॅटिंग – अमित कोळी
सर्वोत्तम बॉलिंग – फिरोज शेख
सर्वोत्तम क्षेत्ररक्षण – सुशांत गुरव
उदयोन्मुख सितारे
सत्यम यादव, सूर्या नायडू
























































