
टॅक्सी चालकाचा मोबाईल चोरून त्याच्या ई-वॉलेट खात्यातून पैसे चोरणाऱया एकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. मनोज यादव असे त्याचे नाव आहे. पोलीस पकडतील या भीतीने तो हैद्राबाद येथे गेला. तेथे तो बांधकामाच्या ठिकाणी मजूर बनून राहत होता.
साकीनाका येथे राहणारे रामलखन हे टॅक्सी चालवण्याचे काम करतात. फेब्रुवारी महिन्यात ते टॅक्सी भाडे घेऊन साकीनाका परिसरात आले. तेव्हा प्रवाशी बनून आलेल्या अतिकुर रेहमानने त्याचा मोबाईल चोरला. त्या मोबाईलला लॉक नसल्याचा फायदा अतिकुरने घेतला. त्यानंतर चोरीचा मोबाईल घेऊन अतिकुर हा मनोजकडे गेला. मनोजने त्या मोबाईलमधील ई-वॉलेटमधून सोने खरेदी केले. त्यानंतर ते सोने एका ज्वेलर्सला विकले. त्यातून आलेले पैसे त्या दोघांनी वाटून घेतले.
रामलखन यांनी मोबाईल चोरी प्रकरणी त्याने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील उपनिरीक्षक अजित लोणकर, पाटील, साळुंखे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी अतिकुरला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्या चौकशीत मनोजचे नाव समोर आले. पोलीस पकडतील या भीतीने मनोज सुरुवातीला उत्तरप्रदेश येथे राहिला. त्याने त्याचा मोबाईलदेखील बंद केला होता. त्यानंतर तो हैद्राबाद येथे गेला. तेथे तो इमारतीत मजूर म्हणून काम करू लागला. तो त्याच्या जुन्या सहकाऱयांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपका&त होता. मनोजची माहिती समजताच पोलीस हैद्राबादला गेले. तेथील एका इमारतीमधून पोलिसांनी मनोजला ताब्यात घेऊन मुंबईत आणले.
























































