
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची (अधिसभा) वार्षिक बैठक सोमवार, 25 मार्चला मुंबई विद्यापीठाच्या फोर्टमधील दीक्षांत हॉलमध्ये होणार होती. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सिनेटची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
आचारसंहितेच्या काळात बैठक घेता येणार नाही, असे कुलपती कार्यालयातून कळवण्यात आले आहे. त्यामुळे सिनेटच्या बैठकीची पुढील तारीख नंतर कळवण्यात येणार आहे, असे मुंबई विद्यापीठाने कळवले आहे.
























































