मोटरसायकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मोटरसायकलस्वाराने दुसऱ्या मोटरसायकलला धडक दिल्याची घटना वनराई परिसरात घडली. या अपघातात दीक्षांत मशिलकर या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीक्षांत हा जोगेश्वरी परिसरात राहत असून तो गोरेगावच्या वेस्टीन सिटी हॉटेलमध्ये कामाला होता. गेल्या आठवडय़ात तो नेहमीप्रमाणे कामाला गेला. रात्री काम संपवून तो मोटरसायकलवरून घरी जात होता. तेव्हा अदाणी इलेक्ट्रिसिटी परिसरात एका भरधाव वेगातील मोटरसायकलने दीक्षांतच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती समजताच वनराई पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी दीक्षांतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दीक्षांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी अज्ञात मोटरसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या