
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत रागदारीवर आधारित आहे. आपण अनेक रागातील गाणी ऐकतो. रागांचे मूर्तस्वरूप दाखवण्याची अभिनव कल्पना पंडित परेश जाना यांनी प्रत्यक्षात आणली आहे. पंडित जाना यांनी ‘मूर्तस्वरूप गौडमल्हार’ या डॉक्युमेंटरीची संगीतप्रेमींसमोर आणली आहे.
शंकरनाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईश्वर खैरमोडे यांनी डॉक्युमेंटरीची निर्मिती केली आहे. गायन आणि संगीतही त्यांचेच आहे, तर दिग्दर्शन शिरीष पवार यांचे आहे. पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे आणि मनोज रवींद्र यांचे गायन आणि अभिनय आहे. नुकतेच पंकज उधास यांच्या हस्ते डॉक्युमेंटरीचे प्रकाशन झाले. यावेळी संगीत संयोजक कमलेश भडकमकर, नृत्यांजलीचे संचालक तुषार गुहा, अन्नोना गुहा, गझल गायक प्रदीप उधास, शायर याकमीजी, कवी प्रथमेश पाठक, लेखिका शिल्पा कांबळे आदी उपस्थित होते. संगीत एक साधना आहे. ‘पॅशन’ असल्याशिवाय कोणतीही कला साध्य होत नाही. या टीमने खूप चांगले कार्य केले आहे. फिल्मच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास पंकज उधास यांनी व्यक्त केला.































































