
साधारणपणे लोक फिट दिसण्यासाठी व्यायाम करतात, जिममध्ये घाम गाळतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे जगभरातील जिम-व्यायामशाळा बंद झाल्या. त्यामुळे फिट दिसायचं कसं ही समस्या फिटनेसप्रेमींपुढे निर्माण झाली. त्यातूनच मार्केटमध्ये मस्कुलर बॉडी सूट हा खास ट्रेंड निर्माण झालेला दिसत आहे.
हा सूट घातल्यावर एखाद्या प्रोफेशनल बॉडीबिल्डरसारखं शरीर दिसतं. त्यामुळेच सुटाची मागणी वाढली आहे. मस्कुलर बॉडी सूटची खासियत म्हणजे, फिट दिसण्यासाठी जिममध्ये जावे लागत नाही की घाम गाळावा लागत नाही. म्हणून ब्रिटनसह अन्य देशांमध्ये त्याची मागणी वाढली आहे. शरीराला नुकसान होऊ नये म्हणून हे सूट मेडिकल ग्रेड सिलिकॉनपासून तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.





























































