
श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून यात त्याचा मुलगा नारायण नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. या व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे नारायणची गोलंदाजी अॅक्शन हुबेहूब वडिलांसारखीच आहे.
मुरलीधरन याने गुरुवारी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एका बाजूला मुरलीधरन तर दुसऱ्या बाजूला त्याचा मुलगा गोलंदाजी करताना दिसतोय. बाप-बेट्याची गोलंदाजी अॅक्शन सारखीच आहे. या व्हिडीओला “पिता और बेटा! वीडियो साभार @SunRisers”, असे कॅप्शन मुरलीधरन याने दिले आहे.
Father and Son Time! Video credits @SunRisers pic.twitter.com/Jv8fYOAZcp
— Muthiah Muralidaran (@Murali_800) July 15, 2021
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये 534 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 800 बळींची नोंद मुरलीधरन याने केली आहे. 2011 मध्ये हिंदुस्थानमध्ये झालेला वर्ल्डकपचा अंतिम सामना मुरलीधरन याचा अखेरचा सामना होता. यानंतर त्याने निवृत्ती घेतली, मात्र तो यानंतर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघासोबत जोडला गेला.





























































