तैमुरशी लग्न करण्यासाठी तगादा लावलेल्या तरुणीची हत्या, कालव्यात आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेयसीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी एका माथेफिरूने तिचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. तरुणीच्या वडिलांना मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देताच पोलिसांनी शोध घेऊन आरोपीला अटक केले आहे.

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील घटना आहे. तबत्सुम असे मृत तरुणीचे नाव असून तिचे विवाहित तैमुरशी प्रेमसंबंध होते. मात्र तबत्सुमने तैमुरकडे लग्नासाठी तगादा सुरू केला होता. त्यावरून त्या दोघांमध्ये सततचे वाद होत होते. नेहमीच्या भांडणांना कंटाळलेल्या तैमुरने हा विषय कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने रविवारी तबत्सुमला भेटायला बोलावून तिचे अपहरण करुन नंतर तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी तैमुरने तिचा मृतदेह एका कालव्यात फेकला. मात्र रात्री उशीर होऊन मुलगी घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तैमुरला अटक केली.

पोलिसांनी तैमुरची कसून चौकशी केली असता त्याने तबत्सुमची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकल्याचे त्याने कबुल केले. पोलिसांनी तैमुरवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तबत्सुमचा मृतदेह कालव्यातून काढून शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला आहे,