
बॉलीवूडमधील ग्लॅमरस दुनियेतील अनेक प्रेमकथा गाजल्या आहेत. अनेक अभिनेते, अभिनेत्रींच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावरही सुरू असते. यात गेल्या काही वर्षांत सर्वाधिक नाव गाजले ते अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे. बॉलीवूडपासून ते थेट हॉलीवूडपर्यंत तिच्या अफेअरच्या सूरस कथा बी टाऊनमध्ये ऐकू येत होत्या. आता दीपिकाबाबत आणखी एका अभिनेत्याने गौप्यस्फोट केला आहे.
अभिनेता आणि मॉडेल मुजम्मील इब्राहिम याने याने दीपिकासोबत आपले अफेअर होते असे म्हटले आहे. दीपिकाने मला प्रपोज केले होते आणि आम्ही दोन वर्ष एकमेकांना डेट करत होतो, असा खुलासा मुजम्मीलने एका मुलाखतीमध्ये केला. यामुळे बी टाऊनमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सिद्धार्थ कनन याला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुजम्मील याने दीपिका आणि स्वत:च्या नात्यावर दिलखुलास चर्चा केली. दीपिका पहिल्यांदा मुंबईमध्ये आली होती आणि त्यावेळी ती मला डेट करत होती. दीपिकाने मला प्रपोज केले होते. आमचे नाते खरे होते. त्या काळात आम्ही सामान्यांसारखे फिरायचो. मुंबईत पावसामध्ये रिक्षातून फिरणे, गाण्यांची फर्माईश करणे आणि एकमेकांसोबत वेळ घालवणे, ते आयुष्यातील खास क्षण होते, असे मुजम्मीलने सांगितले.
त्यावेळी मी एक प्रसिद्ध मॉडेल होतो आणि अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकले होते. तर दीपिका पदुकोण चित्रपटसृष्टीत नवखी होती. आम्ही दोघांनी एकत्र फॅशन शो देखील केले. तिथेच आमच्या मैत्रीला आणि प्रेमालाही सुरुवात झाली, असेही मुजम्मीलने सांगितले. तसेच ब्रेकअपनंतर आम्ही एकमेकांशी बोलणे बंद केले, पण आमच्यात कडवटपणा नव्हता. दीपिकाने रणवीर सिंहसोबत लग्न केल्यानंतर आपच्यात संपर्क राहिला नाही, असेही त्याने सांगितले.
‘स्पिरिट’ नंतर दीपिका पदुकोणला ‘कल्की 2’ मधूनही काढले, अवास्तव मागण्यांमुळे निर्माते बेजार
कोण आहे मुजम्मील इब्राहिम?
मुलम्मील इब्राहिम हा राखी सावंत आणि लकी अलीसोबत साथ परदेसिया सारख्या म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसला होता. तर पूजा भट्ट हिच्या ‘धोखा’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 53 व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बेस्ट मेल डेब्यूसाठी नॉमिनेशनही मिळाले होते. त्यानंतर ‘विल यू मॅरी मी’ या चित्रपटात आणि ‘स्पेशल ऑप्स’ या वेब सीरिजमध्येही तो झळकला.