‘माय पॅड-माय राईट’ व्हिडीओ मेकिंग स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाबार्डची उपकंपनी नॅब फाऊंडेशनने 13-18 वयोगटातील मुलींसाठी ‘माय पॅड-माझा हक्क’अंतर्गत व्हिडीओ मेकिंग स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट केवळ मासिक पाळीविषयी जागरुकता वाढवणे हा आहे. स्पर्धेत सहभागी मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल आणि त्यांचा व्हिडीओ यूट्यूबवरदेखील प्रदर्शित केला जाईल. देशातील मासिक पाळीच्या भीषण वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. केवळ 15 टक्के ग्रामीण महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध आहेत. मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या अभावामुळे उद्भवलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी अंदाजे 75 हजार स्त्रिया मृत्युमुखी पडतात आणि किमान 23 टक्के मुली वयात आल्यावर मासिक पाळीशी संबंधित कारणांमुळे पूर्णपणे शाळा सोडतात. या स्पर्धेविषयीचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी NABFUNDATION च्या वेबसाइटवर भेट देता येईल.