एन. व्ही. रामन्ना नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या सरन्यायाधीशपदी एन.व्ही. रामन्ना यांची नियुक्ती केली आहे. 24 एप्रिल पासून रमन्ना सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील.

 

23 एप्रिल रोजी विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त होतील. निवृत्तीपूर्वी आपला वारसदार निवडण्याचे निर्देश बोबडे यांना दिले होते. त्यांनी एन.व्ही. रामन्ना यांचे नाव सूचवले होते. आता राष्ट्रपती कोविंद यांनी रामन्ना यांच्या नावला मंजूरी दिली आहे.

केंद्राने न्यायमूर्ती रामन्ना यांच्या नावाची सरन्यायाधीशपदी घोषणा केल्याने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रथमच देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर बसणार आहेत. न्या. रामन्ना हे 26 ऑगस्ट 2022 ला सेवानिवृत्त होणार आहेत. म्हणजेच त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांहून कमी असणार आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये न्या. शरद बोबडे यांनी हिंदुस्थानचे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली होती.