बीएसएनएलच्या 371 कर्मचाऱ्यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

407

बीएसएनएल’ या दूरसंचार कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना जाहीर केली होती. यासाठी मागील वर्षात चार नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या काळात पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार होते. या मुदतीमध्ये नगर जिल्ह्यातील 371 कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते. यासर्वांचे अर्ज मंजूर झाले असून ते 31 जानेवारीला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यात 544 कर्मचारी असणाऱ्या ‘बीएसएनएल’कडे आता अवघे 173 कर्मचारी राहिले आहेत.

केंद्र सरकारने बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली होती राज्य घरांमधून नव्हे, तर देशभरातून या योजनेसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते. गेल्या दोन महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये स्वेच्छानिवृत्ती चा विषय चांगलाच गाजला होता. इकडे स्पर्धेचे युग असताना दुसरीकडे बेसन कडे कर्मचाऱ्यांचा वनवा होता. त्यातच स्वच्छ निवृत्ती योजना लागू केल्यामुळे अनेक विषय प्रलंबित राहिलेले होते. कामे करायची कशी व कोणाकडून असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता वास्तविक पाहता बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून खासगीकरणाला विरोध सुरू केलेला होता. अनेक वेळा आंदोलने करून निदर्शने केली होती त्याची दखल मात्र घेण्यात आलेली नव्हती. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वेळेला प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी खाजगी कंत्राटदारामार्फत कामे करून घ्यायची वेळ प्रशासनावर येऊन ठेपली होती. सेवा खंडित करायला नको म्हणून याची दखल बीएसएनएल घेतलेली होती. नगर जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना घेतल्यामुळे आता स्थानिक पातळीवर काम कशा पद्धतीने व कोणाकडून करून घ्यायचे, याबद्दल अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. आगामी काळामध्ये ठेकेदार पद्धतीने आऊटसोर्सिंगद्वारेच कामे करून घेण्याशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचे या विभागातील अधिकारी सांगत आहेत. गेल्या दोन वर्षापासून आऊटसोर्सिंग रिकामे करण्यात येत होती पण आता कर्मचारी स्वेच्छा निवृत्त झाल्यामुळे या महिन्यांमध्ये पुन्हा ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करून कामे करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या